Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडीत २२ मार्च रोजी रंगणार कोमसापचे जिल्हा साहित्य संमेलन! ; मराठी दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी होणार ‘मराठी जागर’ कार्यक्रम.

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा साहित्य संमेलन सावंतवाडी येथे आयोजित करण्यात येणार आहे. दि. २२ मार्च २०२५ रोजी हे साहित्य संमेलन होणार असून शनिवारी जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सावंतवाडी शाखेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सावंतवाडी तालुक्यात हे जिल्हास्तरीय संमेलन होणार आहे.

कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेची मासिक शनिवारी पर्णकुटी विश्रामगृह सावंतवाडी येथे पार पडली. यावेळी सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आले. जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सावंतवाडी शाखेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा दिन’ कार्यक्रम साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले.

दरम्यान, श्री. मस्के यांनी 36 वर्ष जिल्हा बँकेत सेवा बजावल्यानंतर नुकतेच ते सेवानिवृत्ती झाले. या निमित्ताने त्यांच्या पुढील आयुष्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे शुभेच्छा दिल्या. यावेळी कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, आनंद वैद्य, सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष अँड. संतोष सावंत, सचीब प्रा. प्रतिभा चव्हाण, माजी अध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर, उषा परब, अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, अँड. अरूण पणदुरकर, भरत गावडे, अँड. नकुल पार्सेकर, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत-भोसले, मंगल नाईक-जोशी, रामदास पारकर, विनायक गांवस आदी उपस्थित होते.

ADVT –

सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles