काळ आला होता, पण बापमध्ये आला.! ; लेकीसाठी बापाने बिबट्याशी दिली झुंज!

अकोले : एकीकडे जागतिक फादर्स डे साजरा होत असताना आता एका बापाने आपल्या लेकीला बिबट्याच्या तावडीतून वाचवल्याची घटना घडली आहे. बिबट्याने लेकीला उचलून तो शेतात शिरला होता. त्याच वेळी आपल्या मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने हा बाप त्या ठिकाणी गेला तर या बापाचा बिबट्याशी सामना झाला. त्यानंतर बापाने त्याच्या चिमुकल्या लेकीला उचलून थेट पळताना त्यांचा तोल जाऊ दोघे बापलेक विहिरीत पडले. त्यामुळे हे बापलेक जखमी झाले आहे. हा बिबट्या यावेळी झालेल्या आरडाओरडीने पळाला आहे. मात्र या भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता तिच्या आई – वडीलांनी केली आहे.

अकोले तालुक्यातील डोंगरगावमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. आपल्या चार वर्षांच्या चिमुरडीला बिबट्याच्या जबड्यातून सोडवण्यासाठी एका पित्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बिबट्याशी दोन हात केले. मात्र मुलीची सुटका केल्यानंतर जीव वाचवण्यासाठी धावत असताना बाप-लेक दोघेही अंधारात खोल विहिरीत कोसळले. या थरारक घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, परिसरात वाढलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

क्षणाचाही विलंब न करता बिबट्याच्या दिशेने धाव –

शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील मनोज गुंजाळ यांच्या अवघ्या चार वर्षीय मुलगी अवनी हिच्यावर घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. आईच्या पाठीवर असलेल्या अवनी हिला बिबट्याने तोंडात पकडून ओढत नेण्यास सुरुवात केली. मुलीचा आक्रोश आणि आईचा आरडाओरडा ऐकताच वडील मनोज गुंजाळ यांनी क्षणाचाही विलंब न करता बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मनोज गुंजाळ यांनी बिबट्याशी झुंज देत अवनीची सुटका केली. मात्र त्यानंतर मुलीला कडेवर घेऊन घराच्या दिशेने धावत असताना अंधारामुळे ते विहीरीत कोसळल्याने जखमी झाले आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles