Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

‘संस्कार’ नॅशनल स्कूल निरवडेचा सार्थ अभिमान.! : माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांचे गौरवोद्गार. ; आगामी काळात विद्यार्थ्यांना ‘AI’ आधारित शिक्षण : चेअरमन डॉ. चंद्रशेखर जैन . ; ‘संस्कार उत्सव’ २०२५ मध्ये विद्यार्थ्यांनी उधळले कलारंग!

सावंतवाडी : ‘संस्कार नॅशनल स्कूल’ हे आगमी काळात ए. आय. अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता राबविणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले विद्यालय असणार आहे. ही बाब संपूर्ण जिल्ह्यासह मलाही सार्थ अभिमान वाटणारी आहे. संस्थेचे चेअरमन डॉ. चंद्रशेखर जैन हे नेहमीच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुख-सुविधा आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणारे उपक्रम राबवितात, याचा खूप अभिमान आणि आनंद वाटतो, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी यांनी व्यक्त केले. सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलच्या ‘संस्कार महोत्सव – २०२४-२५’ या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी श्रीमती शिंपी मार्गदर्शन करत होत्या. यावेळी व्यासपीठावर चेअरमन डॉ. चंद्रशेखर जैन, आंब्रड हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र राठोड, शाळेचे प्रिन्सिपल हेमंत तानावडे तसेच संस्कार शाळेच्या शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा नंदिनी मांजरेकर, सचिव मनीष सावंत, सहसचिव मनीषा पटेल तसेच माता पालक संघाच्या उपाध्यक्षा संगीता पटेल, सचिव ममता वैद्य तसेच सावंतवाडी येथील शिक्षण प्रेमी सपना पिंगे, श्रीयुत पिंगे आणि शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका स्नेहल गवस यांसह मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्या शुभहस्ते संस्कार स्कूलच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा तंत्रज्ञानाने युक्त अभ्यासक्रम राबविणेबाबत शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना येत्या 23 मार्च रोजी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या पोस्टरचे अनावरणही करण्यात आले.

      

दरम्यान यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांनी संस्कार स्कूलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अत्याधुनिक सुविधांबाबत समाधान व्यक्त करत शाळेचे चेअरमन डॉ. जैन सर यांच्या अभिनव संकल्पनेचे स्वागत करून कौतुक केले. तसेच उपस्थित पालकांनी या ए. आय. आधारित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या शिक्षणाचा लाभ पाल्यांना घेण्याबाबत पालकांना सहकार्य करण्याचे आवाहनही केले.

यावेळी चेअरमन डॉ. चंद्रशेखर जैन यांनी सांगितले की ग्रामीण भागातील पालकांना आपल्या मुलांच्या फीबाबत नेहमी चिंता असते. म्हणून जरी मी विविध सुख सुविधा देत असलो तरी आगामी काळात कोणत्याही प्रकारची फी वाढविण्यात येणार नाही, याची हमी देत असल्याचे सांगितले. तसेच पालकांनी प्रत्येक पालक सभेमध्ये आपला सहभाग नोंदविण्याबाबत आवाहनही केले. आगामी काळात शाळेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थात ए. आय. चा अवलंब केला जातो आहे, असे प्रतिपादन करीत या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेसाठी तयार केले जाणार असल्याचे नमूद केले.

यावेळी विविध स्पर्धेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. उद्घाटन समारंभानंतर विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणदर्शनाचा ‘संस्कार उत्सव’ कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, विविध पारंपारिक व पाश्चात्य नृत्ये, शिवरायांवर आधारित संस्कारशील व बहारदार नृत्ये, तसेच नाट्यछटा सादर करीत उपस्थित पालक व श्रोत्यांची मने जिंकली.

या कार्यक्रमाचे अनोख्या शैलीत बहारदार सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक प्रा. रूपेश पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहाय्यक शिक्षक मनीष सावंत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी प्रयत्न केले.

दरम्यान शाळेचा ‘आदर्श विद्यार्थी’ हा मानाचा पुरस्कार दीपेश परब (इयत्ता दहावी) याला संस्थेचे चेअरमन डॉ. जैन सर व प्रिन्सिपल तानावडे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. शाळेचा या वर्षीचा सर्वोत्कृष्ट ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ उपक्रमशील सहाय्यक शिक्षक रुपेश सावंत यांना तसेच तसेच शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार गेली 14 वर्षे आपल्या सेवेत एकदाही खंड न पाडणारे ड्रायव्हर श्री. पाटकर काका यांना संस्थेचे चेअरमन डॉ. जैन सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ADVT –

सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles