Sunday, July 13, 2025

Buy now

spot_img

भोसले इन्स्टिटयूटचे ‘मेट्रोपल्स आणि रेक्स २०२५’ मध्ये स्पृहनीय यश.! ; तब्बल ३ प्रकारात विजेतेपदाला तर ७ प्रकारात उपविजेतेपदाला गवसणी.!

सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील विद्यार्थ्यांनी मेट्रोपॉलिटन इन्स्टिटयूट, सुकळवाड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मेट्रोपल्स आणि रेक्स २०२५’ या नॅशनल टेक्निकल इव्हेंटमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केले.

कॉलेजच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील १६ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यापैकी ६ विद्यार्थ्यांनी यश मिळवले. टेक्निकल पेपर प्रेझेंटेशनमध्ये सुयोग देसाई व संतोष शर्मा यांनी प्रथम क्रमांक मिळवला. ट्रेझर हंट मध्ये सुयोग देसाई, संतोष शर्मा, संदेश कांबळे आणि रोहन मेस्त्री यांनी विजेतेपद पटकावले. रांगोळी स्पर्धेत रोहन मेस्त्री आणि हर्षद नाईक यांना उपविजेतेपद मिळाले. तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील अथर्व नार्वेकर आणि साईश ठकार यांनी ‘सेमी ह्युमनॉइड बॉट विथ इंटिग्रेटेड एआय’ या प्रोजेक्टसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. टेक्निकल डिबेटमध्ये अथर्व नार्वेकर आणि जानू खरात यांना उपविजेतेपद मिळाले.

तसेच तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील २२ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. त्यापैकी ७ विद्यार्थ्यांनी यश मिळवले. सर्किट मेकिंग मध्ये संदेश वेटे आणि लतिकेश मेस्त्री तर टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन मध्ये रुपाली कटाले आणि अथर्व परब यांना उपविजेतेपद मिळाले. पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये सायली गिरी आणि खुशी मांजरेकर यांना तर स्पॉट फोटोग्राफी मध्ये साहिल आरोलकर याला उपविजेतेपद प्राप्त झाले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य डॉ. रमण बाणे, उप-प्राचार्य गजानन भोसले यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles