Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

कुडाळ येथे शासकीय जागेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व्हावे.! ; तमाम शिवप्रेमी, हिंदुत्ववादी संघटनांची आमदार निलेश राणे यांच्याकडे मागणी.

कुडाळ : कुडाळ – मालवण विधानसभेचे आमदार श्री. निलेश राणे यांनी  बलिदान मासच्या शेवटच्या बलिदान दिनी राजमाता जिजाऊ चौकात उपस्थित राहून अभिवादन केले. तसेच सकल हिंदू समाजा तर्फे कुडाळ शहरात पोलीस स्टेशन चौकात ,शासकीय जागेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक व्हावे असे निवेदन सर्वानुमते आज देण्यात आले. हिंदु संघटनांनी या आधी या चौकाचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण केले आहे. गेले अनेक वर्षाची कुडाळवासियांची अशी मागणी आहे.

या विषयावर बोलताना आमदार नीलेश राणे यांनी आश्वासन दिले, शासकीय पातळीवर मी १००% प्रयत्न करेन ,अन्यथा स्वखर्चाने स्मारक उभे करेन. आपली मागणी पूर्ण करेन, अशी ग्वाही समस्त जमलेल्या सकल हिंदू समाजाला दिली. यावेळी रमाकांत नाईक, विवेक पंडित, सुविनय दामले, बबन घुर्ये, काशिनाथ निकम, समीर सराफदार, राम सावंत, चंद्रशेखर पाटील, देवेश रेडकर, नचिकेत देसाई, धीरज पांचाळ, शुभम देसाई, प्रख्यात काणेकर, महेश गंगावणे, ओंकार मंडलोकर, उदय आईर, घनश्याम परब, मनोज वालावलकर, संतोष परब, प्राजक्ता शिलवलकर, संध्या तेरसे, मृणाल देसाई, अंजली वालावलकर, मावळा ग्रुप आणि इतर उपस्थित होते.

ADVT –

डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles