सावंतवाडी : मराठा मित्र मंडळ आयोजित मळगाव येथील आझाद मैदानावर दि. ५ व ६ एप्रिल रोजी मराठा प्रिमियर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, या स्पर्धेचे यंदा हे पहिलेचं पर्व आहे.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक मळगाव येथील भिल्लवाडी गृपचे अध्यक्ष तथा समाजसेवक श्री.पांडुरंग राऊळ यांच्याकडून रोख रुपये ११,०००/- , X-Brand चे मालक समीर मळगावकर यांच्याकडून आकर्षक चषक, तसेचं द्वितीय पारितोषिक मराठा मिञमंडळ कडून रोख रुपये ७०००/- , कै. विलास उर्फ बंड्या दामोदर चिंदरकर यांच्या स्मरणार्थ योगेश दामोदर चिंदरकर यांच्याकडून आकर्षक चषक असे ठेवण्यात आले असून याशिवाय स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर चषक कै.श्रीधर राऊळ यांच्या स्मरणार्थ राजेश श्रीधर राऊळ यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आला आहे.
या स्पर्धेच्या माहितीसाठी उमेश गुडेकर ९४२१३२५५८५ यांच्याशी संपर्क करण्यात यावा असे आयोजकांनी म्हटले आहे.
मळगाव येथे ‘मराठा प्रिमियर लीग’चे आयोजन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


