‘त्यांना’ चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना? ; अमोल मिटकरींच्या ‘त्या’ पोस्टने वादाला फोडले तोंड.! 

अमरावती : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्यावर सोमवारी कुत्र्याने हल्ला केला होता. सांगली येथील माळी गल्लीतून जात असताना भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यांच्या पायाला त्याने कडकडून चावा घेतला होता. त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. घटनेनंतर त्यांनी सरकारी रुग्णालयात जात उपचार घेतले. या घटनेनंतर राज्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधक आणि समर्थक या मुद्दावरून भिडलेले दिसत आहेत. त्यातच अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी वादाला तोंड फोडले आहे. त्यांनी समाज माध्यम X वर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टवरून सध्या राजकारण तापले आहे.

मिटकरींची ‘ती’ पोस्ट काय?

संभाजी भिडे यांच्या विधानावर यापूर्वी सुद्धा अमोल मिटकरी यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यावरून यापूर्वी सुद्धा वादंग उठले होते. आता संभाजी भिडे यांना भटका कुत्रा चावल्याची घटना घडल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा त्यांच्या अनुयायांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या पोस्टमुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.

“त्यांना” चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना? …..जो कुणी असेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालला पाहिजे. चावतो म्हणजे काय? मुगलाई लागलीय का?, अशी पोस्ट मिटकरी यांनी समाज माध्यम एक्सवर केली आहे. त्या पोस्टवर उलटसुलट प्रतिक्रियांचा महापूर आला आहे. एकूणच या मुद्दावरून शिवप्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधकांत नवीन वाद उफाळला आहे हे नक्की.

ADVT –

खुशखबर ..! – आंबोलीत ‘साप्ताहिक साहसी आणि नेतृत्व विकास शिबीर’. ; The Colonel’s Academy for Adventure & Aero sports आणि सैनिक स्कूल आंबोलीचे संयुक्त आयोजन. ..

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles