सावंतवाडी : तालुक्यातील सैनिक स्कूल, आंबोली या प्रशालेत जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व्यायाम शाळा उद्घाटन सोहळा शानदार संपन्न झाला. जिल्हा क्रीडा विभाग, सिंधुदुर्ग आणि उपसंचालक क्रीडा विभाग, कोल्हापूर यांच्या निधीतून सैनिक स्कूल, आंबोलीला विविध प्रकारचे व्यायाम साहित्य देण्यात आले आहे. सैनिक स्कूल, आंबोली ही जिल्ह्यातील खेळांमध्ये अग्रगण्य शाळा म्हणून नावलौकिक आहे. या व्यायाम शाळा साहित्याचा योग्य वापर शाळेतील विद्यार्थ्यांना होईल. या व्यायाम शाळा उद्घाटन सोहळ्यात क्रीडाधिकारी विद्या शिरस या मुख्य अतिथि म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या शुभहस्ते व्यायाम शाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यायाम आणि खेळाचे महत्व सांगितले. तसेच आंबोली ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक, सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी देखील उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती दाखविली. सैनिक स्कूल, आंबोली ही शाळा म्हणजे आंबोली साठी अभिमान आहे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष सुनील राऊळ, संचालक जाॅय डाॅन्टस, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, प्राचार्य एन. डी. गावडे, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हंबीरराव आडकूरकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्राचार्य एन. डी. गावडे यांनी मानले.
ADVT –
📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇