संतोष राऊळ यांची भाजपा आंबोली मंडल अध्यक्षपदी नियुक्ती.!

सावंतवाडी : भारतीय जनता पक्षाच्या सावंतवाडी विधानसभा संघटनात्मक निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आंबोली मंडल अध्यक्षपदी संतोष अरुण राऊळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी संतोष राऊळ यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव, माजी आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, महिला मंडल अध्यक्षा प्राजक्ता केळुस्कर,मंडल उपाध्यक्ष दिनेश सारंग, विरेंद्र धुरी, सुनील परब, वामन पालयेकर, सावित्री पालयेकर, दादा परब, संदीप हळदणकर, गुरु मठकर, अब्दुल साठी, सिद्धेश तेंडोलकर, योगेश गवळी, बाळकृष्ण सावंत, संदेश सावंत, प्रशांत राऊळ, आनंद तळवणेकर, रामचंद्र गावडे, आत्माराम चव्हाण, राजाराम धुरी, भगवान राणे, सुशांत गावडे, लक्ष्मण राऊळ, रामचंद्र सावंत, रुपेश कुडतरकर, रामचंद्र करमळकर, दीपक सावंत, चंद्रकांत म्हाडगुत, राकेश ठाकूर, प्रवीण सावंत, सुमित राऊळ, विशाल गुरव, मुकेश मोहिते, मंगलदीप पवार, रोशन ठाकूर यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संतोष राऊळ यांच्या नियुक्तीमुळे आंबोली मंडळात पक्षाच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास प्रभाकर सावंत आणि महेश सारंग यांनी व्यक्त केला आहे. उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संतोष राऊळ यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संतोष राऊळ यांची ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.

ADVT –

डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles