बंदरे विकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. आजपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर ! ; बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार विकास कामांचा घेणार आढावा.

  • प्रगतीपथावर असलेल्या बंदरे विभागातील कामांची करणार पाहणी

कणकवली : महाराष्ट्र सागरी महामंडळ (बंदरे विकास विभाग)चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. हे आज पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते बंदर खात्या अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करणार आहे. त्याचप्रमाणे प्रगतीपथावर असलेल्या बंदर विकासाच्या कामांबद्दल अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामांचा ते आढावा घेणार आहे. बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार प्रदीप पी. यांनी आपला हा दौरा आयोजित केलेला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles