सिंधुदुर्गातील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे उतरणार मैदानात! ; आमदार म्हात्रेंनी शिक्षण उपसंचालकांची बोलावली उद्या तातडीची बैठक!

उपसंचालक महेश चोथे, शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्या उपस्थितीत ओरोसमध्ये बैठक.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली होती बैठकीची मागणी.

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आता मैदानात उतरले आहेत.आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी उद्या शिक्षण उपसंचालक महेश चोथे व माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांची महत्त्वपूर्ण व तातडीची संयुक्त सभा बोलवत सहविचार सभेचे आयोजन आहे.या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होणार आहे. तर माध्यमिक शिक्षण विभागाकडून फाईलचा आणी कामांचा निपटारा होत नसल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने तत्काळ बैठकीची मागणी केली होती.या अनुषंगानेच ही बैठक होत असून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराच्या विरोधात काय भूमिका उद्या घेते?तसेच नाराज असलेल्या अन्य संघटना काय भूमिका घेतात?याकडे सर्वाचे लक्ष्य लागून राहिले आहे.तर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना आणी शिक्षण विभागाला या संदर्भात काय आदेश देतात? हे पाहणं औत्सुक्यच ठरणार आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर म्हणाव तशा पद्धतीने कामांचा आणि फायलींचा निपटारा होत नाही आहे.या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांमध्ये नाराजीचा सूर आहे. अनेक शिक्षक व शिक्षकेतर संघटना या विरोधात आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. कालच अध्यापक संघाने ओरोस येथे या संदर्भात आंदोलन केले होते.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर,सचिव नंदन घोगळे आणी कोकण कार्याध्यक्ष सलीम तकिलदार यांनी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याशी फोनद्वारे १५ जून रोजी चर्चा केली होती.त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रलंबित कामाबाबत तक्रारीचा पाढा त्यांनी आमदार महोदयांकडे वाचला होता. त्यानंतर या बैठकीचे आयोजन करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली होती.या अनुषंगाने तत्काळ आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षण उपसंचालक महेश यांना या बैठकीचे आयोजन करण्याचे आदेश दिले होते. या आदेशान्वये शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे.उद्या १९ जून रोजी ओरोस येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे सकाळी ११ वाजता या बैठकीचे आयोजन केले आहे. ज्या ज्या शिक्षकांच्या आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या प्रलंबित आहेत,त्यांनी आपल्या तक्रार अर्जासह उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केले आहे.तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघटना,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles