धुळे : काल बुधवार दि.16/7/2025 रोजी सायंकाळी 5 वाजेला अक्कपाडा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. पावसाने उघडझीप दिल्यामुळे लागवड केलेले कापूस, मका, बाजरी इतर पिके सुकू लागली आहेत.त्यामुळे परीसरातील शेतकऱ्यांनी डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केली होती.
त्याअनुषंगाने चार दिवसांपूर्वी डाव्या कालव्यांला पाणी सोडण्यात आले व आज उजव्या कालव्यांला पाणी 5इंची लेव्हल नुसार 50 क्यूसेस एवढे दररोज पाणी उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येईल.

जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष श्री.मनोहर भदाणे यांच्या हस्ते पाणी सोडण्यात आले.याप्रसंगी माजी कृषी सभापती प्रा. अरविंद जाधव, भाजपाचे नेते बाळासाहेब भदाणे, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाणे, यांच्यासह कुणाल शिंदे, सागर देवरे, धनंजय देवरे, गणेश पाटील, सुनील वाघ, आर. डी. माळी, अजय माळी, संजय सैंदाणे,गोटू अमृतसागर, नामदेव माळी, साहेबराव माळी,पवण कोळी, भुषण देसले, हे पदाधिकारी उपस्थित होते.
उजव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे भदाणे,नेर, देऊर, खुर्द,लोणखेडी,लोहगड,चौगाव, गोताणे, उडाणे, सांजोरीसह परिसरातील गावांना दिलासा मिळाला आहे.याप्रसंगी शेतकऱ्यांनी आमदार रामदादा भदाणे यांचे आभार मानले आहेत.



