सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील जानवली गावची सुकन्या प्रियांका राणे हिने सातासमुद्रापार असलेल्या कॅनडामध्ये भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला आहे. ती कॅनडा ॲम्बेसिडर ग्लोबल किताबाची मानकरी ठरली आहे. या देदीप्यमान यशामुळे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. याबद्दल प्रियांका राणे हिचे सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन होत आहे.



