जिल्हास्तरीय शालेय जुडो स्पर्धेत कु. हेमांगी मेस्त्री अव्वल! ; चराठा गावची कन्या तर माजगाव हायस्कूलची विद्यार्थिनी.

सावंतवाडी : ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय जुडो स्पर्धेत चराठा गावची कन्या असलेली तर माजगाव येथील श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. हेमांगी गजानन मेस्त्री हिने प्रथम क्रमांक पटकाविला. आता तिची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय जुडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

(कोच मंगेश गुगळे, जिम ट्रेनर अबिद कित्तूर)

(अभिनंदन करताना चंद्रशेखर सावंत, भाऊसाहेब चवरे.)
कु. हेमांगी मेस्त्री हिने यापूर्वी अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. हेमांगी मेस्त्री हिचे वडील गजानन मेस्त्री होमगार्ड मध्ये पलटण नायक आहेत. कु. हेमांगी मेस्त्री हिला तिचे कोच मंगेश घोगळे, जिम ट्रेनर अबिद कित्तूर, माजगाव हायस्कूलचे क्रिडा शिक्षक चंद्रशेखर सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कु. हेमांगी मेस्त्री ही माजगाव येथील श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत आहे. या यशाबद्दल तिचे माजगाव शिक्षण सहाय्यक संस्थेचे अध्यक्ष भास्कर कासार, सचिव सीए लक्ष्मण नाईक, मुख्याध्यापक भाऊसाहेब चवरे व शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles