मिहिर मठकरांचं काम ‘लई भारी’!, ‘राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार – २०२५’ जाहीर ! ; कणकवली येथे १६ ऑगस्ट रोजी पुरस्काराचे वितरण.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक कर्तृत्ववान आणि प्रतिभावंत व्यक्तिमत्व मिहिर मठकर यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट समाजरत्न पुरस्कार २०२५’ जाहीर झाला आहे. जनजागृती सेवा संस्थेतर्फे १६ ऑगस्ट रोजी हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

जनजागृती सेवा संस्था (रजि.) यांनी जारी केलेल्या निवडपत्रानुसार, मिहिर मठकर यांनी सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. संस्थेने त्यांचे सामाजिक कार्य भूषणावह असल्याचे म्हटले आहे.

पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कणकवली येथील भवानी सभागृहात संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या पुरस्कारामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान उंचावली असून, श्री. मठकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ म. तिरपणकर आणि सचिव संचिता भंडारी यांनी श्री. मठकर यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles