सावंतवाडी : तालुक्यातील न्हावेली येथील जि.पशाळा नं ४ येथे बालगोपाळ मंडळाच्या सहभागातून दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
बालगोपाल मित्रमंडळाकडून दुपारपासूचं महिलांसाठी तसेचं लहान मुलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम , क्रीडा स्पर्धा व विजेत्यांना बक्षिसे शिवसेना उपतालुकाप्रमुख उपसरपंच अक्षय पार्सेकर व स्वामी सेल्सचे मालक प्रसाद गावडे, वेदश्री इंटरप्रायझेसचे आशिष धाऊस्कर तसेच कन्हैया भरत सारंग (वेंगुर्ला) यांच्याकडून पुरस्कत केली होती.
कार्यक्रम पाहण्यासाठी न्हावेलीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी क्रीडा स्पर्धांमध्ये महिला आणि लहान मुलांनी उस्फुर्तपणे भाग घेऊन स्पर्धेचा उत्साह वाढवला आणि अनेकांनी बक्षिसे जिंकली.
दहीहंडी उत्साहात पावसाळी वातावरण आणि जोरदार पाऊस असूनही गोविंदांचा उत्साह कमी झाला नाही. भरपावसातही प्रेक्षकांनी उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.
स्पर्धेत बाल गोपाळ मंडळाचे अध्यक्ष रुपेश नाईक, उपसरपंच अक्षय पार्सेकर,चंद्रकांत पार्सेकर सगुण नाईक, नवनाथ पार्सेकर, प्रथमेश नाईक, योगेश पार्सेकर, नाना नाईक, रितेश पार्सेकर, सिद्धेश पार्सेकर, राकेश पार्सेकर, अजय नाईक ,मंदार नाईक , संजय मांजरेकर, बाबल सावंत आणि पार्सेकर ब्रदर्स यांच्यासह अनेक न्हवेलीतील युवकांनी मिळून कमी वेळेत चार थरांची मानवी रचना करून दहीहंडी फोडली. यावेळी दहीहंडी फोडण्याचा मान दिपक पार्सेकर यांने मिळवला. स्पर्धेचे सूत्रसंचालन सुदन पार्सेकर यांनी केले
कार्यक्रमस्थळी डिजेच्या थरारक बीट्सवर गोविंदांनी दिलखेचक डान्स करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. घोषणाबाजी आणि फटाक्यांच्या आतषबाजीने जल्लोषाचे वातावरण रंगले होते.


