सावंतवाडी : येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या ‘सेवा पंधरवडा’ या उपक्रमांतर्गत भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘नमो युवा रन’ स्पर्धेला धावपटूंचा उदंड प्रतिसाद मिळाला. विशेषत: युवा वर्गाचा या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सकाळी सहा वाजता सावंतवाडी येथील जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानापासून ही स्पर्धा सुरू करण्यात आली व निसर्गरम्य अशा वातावरणातील मोती तलावाच्या परिसरात या मॅरेथॉन स्पर्धेला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवडानिमित्त ही स्पर्धा घेण्यात येत आहे.

प्रारंभी या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा या उपक्रमांतर्गत भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून सावंतवाडीत देखील ‘नमो युवा रन’चे आयोजन करण्यात आले. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांनी यशस्वीरित्या या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नशामुक्तीचा संदेश देणारी ही मॅरेथॉन होती. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले, राजू राऊळ, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संदीप मेस्त्री, वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष सिद्धेश चिंचळकर, जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा संतोष पुजारे, कुडाळ युवामोर्चा मंडल अध्यक्ष तन्मय वालावालकर, कणकवली मंडल अध्यक्ष सर्वेश दळवी, कणकवली युवा मोर्चा शहर अध्यक्ष सागर राणे, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, प्रसाद अरविंदेकर आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, सावंतवाडी युवामोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, आंबोली युवामोर्चा अध्यक्ष निलेश पास्ते, बांदा युवा मोर्चा अध्यक्ष सिध्देश कांबळी, वेंगुर्ला मंडळ अध्यक्ष प्रणव वायंगणकर, दीनानाथ बांदेकर, प्रा. नाईक, गेळे सरपंच सागर ढोकरे, ॲड. चैतन्य गावडे, अनिकेत आसोलकर, महेंद्र पेडणेकर, तसेच भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
महिला गट –
प्रथम – मेघा प्रमोद सातपुते, द्वितीय – समिक्षा जानू वरक, तृतीय – दिव्या यशवंत दळवी.
खुला गट – पुरुष –
प्रथम – आदित्य राउळ, द्वितीय – नारायण फाले, तृतीय – बाळा सावंत.
16 वर्षाखालील मुले –
प्रथम – तनिष महेश मुळीक, द्वितीय, द्वितीय – आशीर्वाद प्रमोद सातपुते, तृतीय – दीप विष्णू सावंत.
सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांनाही प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.



