अन्याय अत्याचारग्रस्त बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध! : मिलिंद धुरी. ; ‘ह्युमन राईट’ सिंधुदुर्ग जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी जाहीर, जिल्हाध्यक्ष पदी मिलिंद धुरी, सचिव विनोद जाधव तर खजिनदार पदी संदीप सुकी यांची बिनविरोध निवड.

कुडाळ : जनकल्याणाचा ध्यास घेऊन काम करणारी, अत्यंत प्रामाणिक संस्था म्हणून आपल्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडे पाहिले जाते. त्याच अनुषंगाने यापुढे देखील अन्याय,  अत्याचारग्रस्त बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले मिलिंद धुरी यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्गची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कुडाळ येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी श्री धुरी बोलत होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष पदी मिलिंद धुरी, कार्याध्यक्ष म्हणून मनोज तोरसकर, उपाध्यक्ष आनंद कांडरकर,सचिव विनोद जाधव, खजिनदार संदीप सुकी, सरचिटणीस आर.के.सावंत, कायदेशीर सल्लागार ॲड.राजेंद्र खानोलकर तर सोशल मिडिया जिल्हा प्रमुख पदी प्रा. रूपेश पाटील यांची निवड करण्यात आली.

तसेच महिला जिल्हाध्यक्ष पदी सौ. मानसी परब, महिला जिल्हा सचिव सौ. संजना सावंत आदीची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी यांच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली. पुढील एक वर्षासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन सिंधुदुर्गची कार्यकारिणीसाठी सदस्यांची निवडणूक प्रक्रिया पार पडली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles