सावंतवाडी : पार्वती गोपाळ काकतकर (वय ९५) यांचे काल सोमवार दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३.५० वा. लक्ष्मीनगर, सावंतवाडी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या मूळ खानापूर, ता. जि. बेळगाव येथील असून सावंतवाडी येथे वास्तव्यास होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सून, नातवंडे, पंतवंडे असा मोठा परिवार आहे. माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्लीचे उपक्रमशील शिक्षक पांडुरंग काकतकर यांच्या मातोश्री तर वेत्ये येथे कार्यरत ग्राम विकास अधिकारी अनुराधा काकतकर यांच्या त्या सासू होत.



