सावंतवाडी : येथील भाजपचे प्रभाग क्रमांक ६ चे उमेदवार अमित गवंडळकर व मेघा दुबळे यांनी आज गणेश मंदिरात श्रीफळ वाढून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना अमित गवंडळकर म्हणाले,”पक्षाने माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली, याबद्दल मी सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो. प्रभागातील गोरगरिबांच्या समस्या समजून घेण्यासाठी मी थेट त्यांच्या दारी जाईन. तसेच जास्तीत जास्त मतांनी विजयी होण्यासाठी मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे.”.
यावेळी सुधीर आडिवरेकर म्हणाले, जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे. सेवेची संधी दिल्यास आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू असेही ते म्हणाले. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच श्री. गवंडळकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



