वेंगुर्लमध्ये भाजपला शत प्रतिशत यश मिळणार! : जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी. ; वेंगुर्लेत भाजपाच्या वतीने जोरदार प्रचाराचा शुभारंभ! 

– प्रभाग ३ व ४ मध्ये स्थानिक देवतांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात.

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपला उत्तुंग यश मिळेल, वेंगुर्लमध्ये भाजपला शत प्रतिशत यश मिळणार, असा आशावाद जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी व्यक्त केलाय.

येथील प्रभाग क्रमांक ३ आणि ४ या प्रभागातील गणपती मंदिर , काका काकी मंदिर , पिंपाळेश्वर , श्री.स्वयंभु मंदिर , लोपाद्रेश्वर मंदिर , ब्राम्हण देवस्थान , लक्ष्मीनारायण मंदीर ,भवानी देवस्थान येथे श्रीफळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ.
वेंगुर्ले शहरात भाजपाने सर्वप्रथम देव देवतांचे आशिर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला . प्रभाग क्रमांक ३ व ४ चे भाजपा चे उमेदवार सुहास गवंडळकर , गौरी मराठे , सुधीर पालयेकर व आकांक्षा परब या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ देव देवतांचे आशिर्वाद घेऊन करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी , जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष पपु परब , महीला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा वृंदा गवंडळकर , अमेय धुरी , दिनेश धर्णे , मयुरेश फाटक , गौरेश गावडे , भुपेन हादगे , हिमांशु कुडपकर , यतीन कुडपकर , साहील कुडपकर , अंकीत राणे , नितीन राणे , अक्षय सावंत , प्रणीत सावंत , बाबल अणसुरकर , दिपक परब , राज परब , यश परब आदी उपस्थित होते.u

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles