सावंतवाडी: निगुडे नंबर एक येथे शाळेच्या विविध भौतिक सुविधांसाठी माजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थ यांनी शाळेची संपूर्ण लाईट फिटिंग, पाण्याच्या टाकीची उंची वाढवणे व संपूर्ण नवीन पाईपलाईन करणे या कामासाठी कै . गणेश नारायण केणी यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुन सौ. उमा सतीश केणी व श्री. सतीश गणेश केणी यांनी आपण स्वतः या शाळेत शिकलो नाही . परंतु माझे सासरे तथा ह्यांचे वडील याच शाळेत शिकले त्यामुळे कुठून तरी आम्ही पण या शाळेला देणं लागतो. ही भावना व्यक्त करून 10,000/ रुपये एवढी मदत केली . तसेच या शाळेचे माजी विद्यार्थी व स्टेट बॅक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी . श्री. सत्यवान लक्ष्मण शेलटे यांनी ई – मिडीया वरील आपल्या शाळेची बातमी वाचून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तथा माजी उपसरपंच श्री. गुरुदास वासुदेव गवंडे ग्रामपंचायत निगुडे यांचेशी संपर्क साधून 5000/ रुपये एवढी मदत केली . तसेच पुर्ण प्राथमिक शाळा निगुडे नंबर एकचे शिक्षक श्री. प्रशांत अनंत कांदे सर यांनी प्रत्येक वेळी माजी विद्यार्थी किंवा पालक यांनीच मदत करावी किंवा ती त्यांचीच जबाबदारी आहे असे न म्हणता आम्ही शिक्षक पण या जबाबदारीचा एक भाग आहोत अशी भावना ठेवावी कारण मुलं आपल्या आई वडीलांकडून चांगल्या वाईट गोष्टी न शिकवता शिकत असतात तसेच शाळेत शिक्षकांन वरही मुलांचा बारीक लक्ष असतो व त्यांच्या कडूनही काही गोष्टी न शिकवता शिकत असतात त्याचाच एक भाग म्हणून शिक्षक जर शाळेच्या एखाद्या गोष्टीत मदत करत असतील तर तो आदर्श तथा शिक्षण मुलं नक्कीच घेतील व मोठी झाल्यावर आपणही न सांगता मदत करतील . मदत काय केली तथा पैसे कीती दिले हा भाग वेगळा . आमची ही मदत त्या हेतूने आहे, असे मत व्यक्त केले व रुपये 3000/ एवढी मदत केली.
तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री. नारायण शांताराम राणे यांनी वरील दोन्ही कामांच्या कामगारांना चहा पाणी व नास्टा या साठी 2000/ रुपये मदत केली.
वरील सर्व कामे करण्यास हातभार लावल्यामुळे मुलांची होणारी गैरसोय दूर झाली व दोन्ही कामे पूर्ण झाली आहेत.
वरील सर्व दात्यांचे व आतापर्यंत देणगी देणाऱ्या सर्व दात्यांचे तसेच सरस्वती पुजनासाठी व मुलांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मदत करणाऱ्या सर्व दानशुर व्यकींचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. महेश गावडे व सर्व सदस्य यांनी आभार मानले .
तसेच शाळेच्या मुलांची शैक्षणिक गरज ओळखून शाळेला मदतीची स्वतःपासून पहिली सुरुवात करून शाळेला स्मार्ट टिव्ही दिला . शाळा व्यव्यस्थापन समिती अध्यक्ष श्री. महेश भिवा गावडे यांनी अध्यक्ष किंवा एक जबाबदार व्यक्ती कसा असावा. त्याची कर्तव्ये काय याच उत्तम उदाहरण सर्वासमोर ठेवल आहे . व त्यानंतर शाळेला दुसरा स्मार्ट टिव्ही देणारे निगुडे सरपंच श्री. लक्ष्मण गंगाराम निगुडकर यांचे पुतणे डॉ. गोविंदा गोपाळ निगुडकर यांचही शिक्षण मुंबई येथे झाले . परंतु आपले वडील याच शाळेत शिकले व कलेक्टर सारख्या उच्च पदावर पोचले त्यामुळे मी पण डॉक्टर झालो व माझा परिवार आज सुखी समृद्ध जीवन जगतोय तो याच शाळेमुळे असा भावनिक संवाद मुलांशी साधला व मार्गदर्शन केले. व ज्या ज्या वेळी आपल्याकडून शाळेला मदतीची गरज भासेल त्या त्या वेळी आपण मदत करणार असल्याचे आश्वासन दिले . त्यांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री. नारायण पुंडलिक नाईक व मुलांनी मानले. तसेच शाळेप्रती अशीच प्रेमळ भुमिका ठेवून उर्वरित कामे मार्गी लावण्याची सर्वांना विनंती केली .



