सावंतवाडीतील प्रभाग क्रमांक ९ मध्ये शिंदे शिवसेनेची प्रचारात मुसंडी.

सावंतवाडी-: शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये शिंदे शिवसेनेचे उमेदवार अजय गोंदावळे व पूजा आरवारी यांनी झंजावाती प्रचार सुरू केला आहे जवळपास 90% घरात शिंदे शिवसेनेचा धनुष्यबाण पोचवण्यात ते यशस्वी झाले आहेत. दोघांनाही कार्यकर्त्यांची साथ, जनतेचा प्रचंड पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत आहे. या प्रभागातून नगराध्यक्ष च्या उमेदवार अँड नीता सावंत कविटकर यांना मताधिक्य देण्याबरोबरच माझ्यासह सहकारी उमेदवाराला प्रचंड मताने विजयी आणणार असा आशावाद श्री गोंदावळे यांनी व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अजय गोंदावळे व पूजा आरवारी यांनी शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये उडी घेतली आहे. त्यांच्या उमेदवारीनंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रचारावर जोरदार भर दिला आहे. खुद्द श्री. गोंदावळे व सौ. आरवारी यांनी कार्यकर्त्यांसमवेत विकासाचे व्हिजन पोहोचविले आहे. मतदारांच्या समस्या जाणून घेण्याबरोबरच त्या त्या भागातील विकास कामांची नोंद ते घेत आहेत. एकूणच दोघांच्याही कामावर आणि विकासाच्या व्हिजनावर लोकांचा त्यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे. जनतेने माझ्यावर विश्वास ठेवावा समस्या याच माझ्या समस्या समजून भविष्यात त्या दृष्टीने मी आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून काम करणार आहे. तसेच या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह दोन्ही उमेदवाराला जनतेने धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles