सीमा मठकरांचा प्रचाराचा झंझावात, मतदारांचा मिळतोय वाढता प्रतिसाद!

सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या उमेदवार सीमा मठकरांनी संपूर्ण सावंतवाडी पिंजून काढत ‘डोअर टू डोअर’ प्रचाराच्या माध्यमातून प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. सावंतवाडीतील संपूर्ण दहा वार्ड आपल्या समर्थकांसह त्यांनी अक्षरश: पिंजून काढले. विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ व शहर संघटक निशांत तोरसकर यांच्या साथीने सौ. मठकर यांनी प्रत्येक प्रभागात जाऊन मतदार बांधवांची भेट घेत आपली भूमिका स्पष्ट करत मतदानाचे आवाहन केले आहे. आपले सासरे स्वर्गीय आमदार जयानंद मठकर यांच्या माध्यमातून सावंतवाडीचा सांस्कृतिक व वैचारिक ठेवा यापुढेही अविरत चालू ठेवण्यासाठी तसेच जनसामान्यांच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी मला आपण संधी द्यावी. या संधीचे आपण नक्की सोने करू, असा ठाम विश्वास त्यांनी मतदारांना दिला आहे. दरम्यान सावंतवाडीकर मतदारांनी देखील सौ. मठकर यांना सकारात्मक प्रतिसाद देत त्यांचा आत्मविश्वास वाढवला आहे. सीमा मठकर यांचे सुपुत्र मिहीर मठकर आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या माध्यमातूनही युवा मतदारांमध्ये आपली एक वेगळी ओळख व आदराचे स्थान सीमा मठकर यांनी मिळविले आहे. दरम्यान सद्य:स्थितीत सौ. मठकर यांच्या प्रचारातील आघाडीमुळे सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठीची लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles