मळगाव येथील खानोलकर वाचन मंदिरात आज रंगणार वक्तृत्व स्पर्धा.

सावंतवाडी : तालुक्यातील मळगांव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्या वतीने डॉ. अरविंद खानोलकर पुरस्कृत स्व.डॉ. सौ. मालती दत्तात्रय खानोलकर स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता ग्रंथालयाच्या ‘रमाकांत सुर्याजी खानोलकर सभागृहात’ करण्यात आले आहे.

स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी असून इ.५वी ते ७वी गटासाठी १) मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज २) वाचाल तर वाचाल ! ३) निसर्ग माझा मित्र !, असे विषय ठेवण्यात आलेले आहे. स्पर्धकांनी कोणत्याही एका विषायावर ४ ते ५ मिनिटे बोलायचे आहे.

इ. ८वी ते १०वी गटासाठी १) मोबाईल शाप कि वरदान ! २) ‘वस्त्रहरण’ कार गंगाराम गवाणकर ३. दैनदिन जिवनात व्यायामाची गरज हे विषय ठेवण्यात आले असून स्पर्धकांनी कोणत्याही एका विषायावर ५ ते ६ मिनिंटे बोलायचे आहे. स्पर्धा सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, वेंगुर्ला तालुका मर्यादित असून एका शाळेतून जास्तीत जास्त ३ स्पर्धकांना एका गटातून भाग घेता येईल. स्पर्धकांना एस.टी चा येण्या-जाण्याचा प्रवास खर्च व अल्पोपहार देण्यात येणार आहे. दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे प्रथम रु. १०००/-, द्वितीय रु.७५०/-, तृतीय रु.५००/- व उत्तेजनार्थ प्रत्येकी दोन रु. २००/- याप्रमाणे रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles