सावंतवाडी : सावंतवाडीमधील ९ जुलै २०२५ रोजी जेलच्या मागील व शिल्पग्राम परिसरातील झालेल्या घरफोडी/ चोरीच्या गुन्ह्यातील हड्या- गुड्या गँगमधील आरोपी देवगन विजय उर्फ बापू पवार (वय 24, रा. आटपाटी जि. सांगली)
यास पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर , गौरव परब यांच्या पथकाने सांगली – आटपाडी पोलिसांच्या मदतीने सांगली शहरातून शुक्रवारी २१/११ रोजी ताब्यात घेतले. त्यास सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता सोमवार पर्यंत ३ दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.
नमुद आरोपी हा गोवा – पेडणे येथील घरफोडीच्या गुन्ह्यात गोवा पोलिसांना देखील पाहिजे असून गोवा पोलिसांचे पथक देखील त्यांच्या मागावर होते.
या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर करत असून गुन्ह्यातील यापूर्वीच अटक केलेले हे आरोपी जुलैपासून अद्याप न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये आहेत.



