पेडणे : गांवकरवाडा (मये–गोवा) : येथील श्री बाळवस देव मंदिरात मार्शीर्श शुद्ध ४ ते ६, दिनांक २४ ते २६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान भव्य मुर्तिप्राणप्रतिष्ठा व जीर्णोद्धार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री बाळवंस देवाच्या नूतन मूर्तीची प्रतिष्ठापना वास्तुशांतीसह विविध धार्मिक विधींनी संपन्न होणार आहे.

सोमवार, २४ नोव्हेंबर
सकाळी ८ वाजता नोंदव, मंगलारती, सकाळ प्रार्थना, नारळ विडे वेचून देवताअवेदन, गणपतीपूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, चंडी होम, संकल्प, श्रौतकल्प, कोडुकक्षेम, प्राकारस्था, मंडपपूजन, तत्तवान, सूक्तपाठ व शांतिपाठ या विधींनी कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.
मंगळवार, २५ नोव्हेंबर
सकाळी ८ वाजता नोंदव, मंगलारती, प्राकरशुद्धी, मंडपातील देवता पूजन, स्नानविधी, मुख्यदेवता स्थान, पूजन, अभिषेक, ग्रह-वासरूपण, पर्याणहवण, मुख्यदेवता हवण, तत्त्वहवन व शांतिपाठ.
बुधवार, २६ नोव्हेंबर
सकाळी ८ वाजता नोंदव, मंगलारती, प्राकरशुद्धी, मधुकर्पपूजन, मंडपातील देवता पूजन.
सकाळी ९.३० वाजता सुवर्णहोम, देवशांती, प्राणप्रतिष्ठा, महापूजा, तत्त्वन्यास, पुण्याहवाचन व क्षेत्रपाल महाबल्ली पुजने, महापूजेनंतर आरती.
दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन.
रात्री ८ वाजता कारासोकर–कारवळेकर मेयेकर भजनी मंडळातर्फे भजन व सुंदर धार्मिक कार्यक्रम सादर होणार असून, उपस्थित भाविकांना अध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
श्री बाळवंस देव उत्सव समिती, गायकवाडवाडा यांनी सर्व भक्तांना सहकुटुंब उपस्थित राहून धार्मिक विधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी -9823242178, 9850043537 या नंबरवर संपर्क करावा.



