पालकमंत्री नितेश राणे यांचे सूक्ष्म नियोजन! ; सावंतवाडीत कॉर्नर बैठकांवर भर.

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडीत कॉर्नर बैठकांवर भर दिला आहे. शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांशीही ते गाठीभेटी घेत आहेत. भाजपचा नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आणण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आहे.

सालईवाडा येथे त्यांनी ही बैठक घेतली. यावेळी जनतेशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. आपल्या विचारांचा नगराध्यक्ष, नगरसेवक निवडून देण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले. देशात, राज्यात भाजपच सरकार आहे. त्यामुळे सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, भाजपचे नगरसेवक पदासाठीचे उमेदवार अमित गवंडळकर, मेघा डुबळे, प्रतिक बांदेकर, सुकन्या टोपले आदींसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते ‌

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles