जब केसरकर मैदान में डटे तो सारे संकट लगते है छोटे! ; दीपकभाई झाले प्रचारात सक्रिय, कार्यकर्त्यांमध्ये आला तुफानी जोश!

✍️ रूपेश पाटील.

सावंतवाडी : अखेर माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर आता मैदानात प्रचंड सकारात्मक ऊर्जा घेऊन उतरले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपल्या होम पिचवर आजपर्यंत इतरांची डाळ शिजू न देणारे अत्यंत चाणाक्ष नेते म्हणून श्री केसरकर यांची ओळख आहे. रविवारी त्यांनी सावंतवाडी शहरातील बाहेरचा वाडा परिसर व प्रभाग क्रमांक एक व चारमध्ये जोरदार प्रचार रॅली काढून मतदारांना शिवसेनेला मतदान करण्यासाठी साकडे घातले. आमदार केसरकर स्वतः Active मोडवर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि जोश निर्माण झाल्याचे चित्र दिसले.

माजी शालेय शिखण मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी शहरात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. कॉर्नर बैठकांवर त्यांनी भर दिला आहे‌. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. निता सावंत-कविटकर यांच्यासह २० ही नगरसेवक विजयी होतील, असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला.

बाहेरचावडा परिसरात प्रभाग १ व ४ मध्ये त्यांनी जोरदार प्रचार करत आपली ताकद दाखवली. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर यांचा प्रचार त्यांनी केला. तसेच येथील उमेदवार उमेदवार ॲड‌. सायली दुभाषी, प्रसाद नाईक, हर्षा जाधव, बासिर पडवेकर यांना जनता मोठ्या मताधिक्याने निवडून देतील असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला‌. यावेळी शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, माजी नगरसेवक नासिर शेख, काशिनाथ दुभाषी, बंटी पुरोहित, आबा केसरकर, सचिन साटेलकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles