अटल प्रतिष्ठानतर्फे भारतरत्न वाजपेयींना जयंतीनिमित्त अभिवादन!

सावंतवाडी : भारताचे भूतपूर्व पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची शंभरावी जंयती अटलजीनां मनोभावे वंदन करून साजरी करण्यात आली. माजी सैनिक व अटल प्रतिष्ठानचे माजी खजिनदार महादेव लिंगवत यांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर यांनी सांगितले की, आपण जिल्ह्यात सातत्याने गेली वीस वर्षे अटलजीसारख्या देशातील सर्वसमावेशक नेत्याच्या नांवाने स्थापन केलेल्या न्यासाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, शैक्षणिक, समुपदेशन करिअर मार्गदर्शन अशा विविध क्षेञात उपक्रम सुरू असून त्याचा उपयोग समाजातील अनेक घटकांना होत असून अटलजींचा निस्सीम भक्त म्हणून हे सातत्य राखण्याचा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून नेहमीचं राहिलं, अशा भावना व्यक्त करून अटलजींचे स्मरण केले.

यावेळी अटल प्रतिष्ठानचे कार्यकारीणी सदस्य प्रसाद महाले, सहकार्यवाह ॲड. सौ. अनुराधा परब, खजिनदार श्रीमती अर्पिता वाटवे, सामाजिक कार्यकर्त्यां सौ. मानसी परब, माजी सैनिक व कौशल्य विकास विभागाचे लेखापाल नामदेव सावंत, एस एस संगणक प्रशिक्षण केंद्राचे संचालक रघुनाथ तानावडे, कु. रविंद्र विरनोडकर, कार्यालयीन प्रमुख कु. ज्योती राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles