तळवडे येथे आज इंग्लिश मीडियम स्कूल व ब्लूमिंग बड्सचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा.

सावंतवाडी : तालुक्यातील इंग्लिश मीडियम स्कूल, तळवडे व ब्लूमिंग बड्स प्री-प्रायमरी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. “PRISM – One Stage Many Colours” या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या कला, कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकासाचे सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम आज शनिवार, दि. 10 जानेवारी 2026 रोजी सायं. 5.00 वाजता शाळेच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी प्रा. रुपेश पाटील (मुख्य संपादक, सत्यार्थ महाराष्ट्र न्यूज) असणार आहेत. तसेच श्री. विठ्ठल बी. नाईक (सचिव, बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट, सावंतवाडी) हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

या वेळी विशेष निमंत्रित म्हणून ट्रस्टचे व्हाईस चेअरमन डॉ.अशोक सुर्वे, सचिव व्ही. बी. नाईक, संचालक राजाराम गावडे, खजिनदार सी. एल. नाईक तसेच सदस्य डॉ. नितीन सावंत, मनोज नाईक, प्राध्यापक सतीश बागवे व केंद्रप्रमुख शिवाजी गावित आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मैथिली नाईक, मुख्याध्यापक अजय बांदेकर, सौ. श्रिया माणगावकर, उपमुख्याध्यापक वसंत सोनुर्लेकर, एचओडी प्रियांका गावडे, सुपरवायझर प्रिया मल्हार तसेच विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी माहीका वजराटकर व विद्यार्थी प्रतिनिधी कुमार वेद चिंदरकर तसेच इतर पदाधिकारी, संचालक, सदस्य, मान्यवर पाहुणे, पालक व शिक्षक उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे नृत्य, सांस्कृतिक सादरीकरणे तसेच शैक्षणिक व सहशैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.

शाळेच्या व्यवस्थापन समिती, शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष तयारी केली असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. उपस्थितांची गौरवशाली उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवेल, असा विश्वास शाळा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles