२४ पैकी तब्बल १९ चेंडू निर्धाव! ; आरसीबीच्या ६.२ फूट गोलंदाजाने पदार्पणाच्या सामन्यात केला कहर!

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात आरसीबीने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात मुंबईला 154 धावांवर रोखण्यात यश आलं. आरसीबीकडून नादीन डी क्लार्कने भेदक गोलंदाजी केली. तिने चार विकेट काढल्या. तर लॉरेन बेल आणि श्रेयंका पाटीलने प्रत्येकी एक विकेट घेतली. आरसीबीकडून खेळणारी इंग्लंडची वेगवान गोलंदाज लॉरेन बेलने तिच्या पदार्पणाच्या सामन्यातच शानदार कामगिरी केली. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना अडचणीत आणलं. मुंबईच्या फलंदाजांना धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला.

लॉरेन लॉरेन बेलने सामन्याची सुरुवात निर्धाव षटकाने केली. या षटकात एकही धाव फलंदाजांना काढता आली नाही. तिच्या पहिल्या दोन षटकांमध्ये एकूण 11 डॉट बॉल होते. मुंबई इंडियन्सची सलामीवीर अमेलिया केर आणि जी कमलिनी यांच्यावर प्रचंड दबाव आला होता . (Photo: RCB Twitter)

(Photo: RCB Twitter)

लॉरेन लॉरेन बेलने सामन्याची सुरुवात निर्धाव षटकाने केली. या षटकात एकही धाव फलंदाजांना काढता आली नाही. तिच्या पहिल्या दोन षटकांमध्ये एकूण 11 डॉट बॉल होते. मुंबई इंडियन्सची सलामीवीर अमेलिया केर आणि जी कमलिनी यांच्यावर प्रचंड दबाव आला होता. लॉरेन बेलने तिच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 14 धावा दिल्या. यात तिने 19 डॉट चेंडू टाकले आणि एक विकेटही घेतली. बेलच्या गोलंदाजीमुळे एमआयला सुरुवातीच्या षटकांमध्ये धावा करण्यापासून रोखले. त्यामुळे पॉवरप्लेमध्ये स्कोअरिंग रेट खूपच कमी राहिला.

लॉरेन बेलची उंची 6 फूट 2 इंच असल्याने तिच्यासाठी ही एक मोठी फायद्याची बाब ठरली. हार्ड लेंथवरून गोलंदाजी करताना तिला अतिरिक्त उसळी मिळत होती. ज्यामुळे फलंदाजांना खेळणे कठीण झाले. या सामन्यात तिची उंची आणि अचूक लाईन आणि लेंथने मुंबईच्या फलंदाजीला धक्का दिला.

लॉरेन बेलची उंची 6 फूट 2 इंच असल्याने तिच्यासाठी ही एक मोठी फायद्याची बाब ठरली. हार्ड लेंथवरून गोलंदाजी करताना तिला अतिरिक्त उसळी मिळत होती. ज्यामुळे फलंदाजांना खेळणे कठीण झाले. या सामन्यात तिची उंची आणि अचूक लाईन आणि लेंथने मुंबईच्या फलंदाजीला धक्का दिला . (Photo: WPL Twitter)

(Photo: WPL Twitter)

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles