कणकवलीचे विद्यामंदिर हायस्कूल लई भारी, चित्रकला परीक्षेत निकाल ‘शंभर नंबरी’ ; ​नव्याने सुरु झालेल्या परीक्षा केंद्राचा निकालही ९९ टक्क्यांच्या पार!

कणकवली : महाराष्ट्र राज्य कला संचालनालयातर्फे सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला ग्रेड (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) परीक्षांचा निकाल नुकताच घोषित झाला. या परीक्षेत कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत प्रशालेचा निकाल १०० टक्के राखला आहे. विशेष म्हणजे, यंदा या प्रशालेत नव्याने मंजूर झालेल्या ग्रेड परीक्षा केंद्राचा निकालही उत्कृष्ट लागला आहे.
विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे याच वर्षापासून चित्रकला ग्रेड परीक्षेचे केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रावर एलिमेंटरी परीक्षेसाठी १८१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी १८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून केंद्राचा निकाल ९९.४५% लागला आहे. तसेच इंटरमिजिएट परीक्षेसाठी १४८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी १४६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन केंद्राचा निकाल ९८.६५% इतका लागला आहे.

प्रशालेचा शंभर टक्के निकाल – 
विद्यामंदिर हायस्कूलच्या दोन्ही परीक्षांचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी विविध श्रेणींमध्ये यश मिळवले आहे:
​एलिमेंटरी परीक्षेमध्ये अस्मी मेस्त्री, अस्मि राणे, भक्ती गावडे, हर्ष कडूलकर, हर्षद सावंत, मोहित सुतार, मृणाल पाटील, ओंकार परब, पूर्वा धोत्रे, साक्षी गलोले व श्रुती कांबळी या विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी (Grade A) पटकावली. तर अनुष्का राणे, दीप्ती यादव, दुर्गाई कदम, गार्गी बोडेकर, गौरवी खांदारे, कस्तुरी राणे, नंदिनी राणे, प्रिया मोहिते, रिया ठाकूर, सचिन परब, श्रावणी सावंत व विराज परब हे विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. इतर १७ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
​इंटरमिजिएट परीक्षा: अथर्व सावंत, भक्ती कांदळकर, भाविका सावंत, भूमी मगम, चिन्मयी नानचे, देविका राऊळ, गौरेश काडगे, गिरिजा गुरव, कर्तुत्वा हरकुळकर, कावेरी राणे, किमया गोसावी, मीरा नवरे, मृण्मयी श्रावणकर, पार्थ कांबळे, पूजा वाघमोडे, समृद्धी गाडी, संतोषी आळवे, श्री ठाकूर, श्रेया कदम, सिद्धार्थ जाधव, स्वरा भुजबळ, तन्वी सावंत, तुषार मेस्त्री, वैष्णवी लाड, विघ्नेश तेली व आदित्य कदम या २६ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवून विशेष यश संपादन केले. आशिष मेस्त्री, अक्षता कुलकर्णी, भक्ती परब यांच्यासह १० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

मार्गदर्शन व अभिनंदन! – 
या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे कलाशिक्षक श्री. प्रसाद राणे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री. पी. जे. कांबळे, पर्यवेक्षक श्री. ए. व्ही. वनवे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles