सावंतवाडी : येथील संशयित आरोपी श्रीकांत चंद्रकांत आजगावकर (वय 56, राहणार सालईवाडा, सावंतवाडी) हा सालईवाडा ते फॉरेस्ट ऑफिसकडे जाणाऱ्या रोडलगत संध्याकाळी 6 वाजताचे सुमारास 1600/- रुपयाची अवैध दारू आपले ताब्यात विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेल्या स्थितीत मिळून आला. म्हणून त्याच्याविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक श्री. सरदार पाटील, हवालदार श्री. अनिल धुरी जाधव, श्री. दुधवडकर यांनी केली.
अवैध दारू विक्री प्रकरणी सावंतवाडी येथे एका विरुद्ध गुन्हा दाखल!
0
109



