बांदा येथील डॉ. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाची राज्यस्तरावर धडक.

सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथे शालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १४ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या या स्पर्धेत १९ वर्षा खालील मुलांच्या गटात खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदाच्या १९ वर्षा खालील विद्यार्थ्यांच्या संघाने चमकदार कामगिरी करत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला.

या संघात अथर्व केसरकर, परशुराम गावडे, आर्यन गावकर, अर्जुन पाटील, गुरुप्रसाद धारगळकर, लवू नाईक, रुपेश देसाई, यशवंत बांदेकर, मंथन गावडे, आर्यन जाधव, आयुष वालवलकर, अनंत सावंत, ओंकार झाट्ये हे खेळाडू आहेत तर क्रीडा शिक्षिका सुमेधा सावळ आणि सुनील परब यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन या मुलांना लाभले.

हा संघ कोल्हापूर विभागीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मार्गदर्शक सुनील परब यांच्या सोबत म्हसवड तालुका माण, जिल्हा सातारा येथे रवाना झाला होता. तेथेही हा संघ उत्कृष्ट कामगिरी बजावत कोल्हापूर विभागांतर्गत विजयी चषकाचा मानकरी ठरला असून राज्य स्तरावर प्रवेश करता झाला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबाबत खेमराजचे नवनियुक्त प्राचार्य प्रदीप देसाई यांनी सर्वांचे अभिनंदन केले. सर्व शिक्षक, कर्मचारी तसेच पालक आणि माजी विद्यार्थी यांच्याकडून या खेळाडूंचे कौतुक होत आहे. बांदा नवभारतचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर तसेच खजिनदार वैभव नाईक यांनी या संघाचे विशेष कौतुक केले आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles