सावंतवाडी : भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी मंगळवारी कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीला पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली.
या वेळी उपस्थितांनी ही निवडणूक आपलीच असल्याच्या भावनेतून महेश सारंग यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून मतदारसंघात सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले.

बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. पक्ष संघटना अधिक बळकट करून तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
कोलगाव मतदारसंघात महेश सारंग यांच्या उमेदवारीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, येणाऱ्या निवडणुकीत मोठ्या विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे.



