सावंतवाडी: तालुक्यातील मळगांव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात दत्ताराम जी सडेकर पुरस्कृत शालेय विद्यार्थी निबंध लेखन स्पर्धा झाली. व्यासपीठावर ग्रंथालयाचे अध्यक्ष महेश खानोलकर, उपाध्यक्ष बाबली नार्वेकर प्रमुख अतिथी दत्ताराम सडेकर व सुहासिनी सडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले. प्रमुख अतिथी दत्ताराम सडेकर यांनी मुलांनी आपले आरोग्य चांगले राहाण्यासाठी तसेच शरीर निरोगी राहाण्यासाठी आवर्जुन प्राणायाम करावा. व आपल्या गुरुजनांप्रती आदर ठेवावा. त्यांचा सन्मान राखावा. असे आवाहन केले.
निबंध लेखन स्पर्धेत राणी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडीच्या तेजस्वी शैलेंद्र सगम या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवला. वेदांती सत्यवान नवार (उभादांडा हायस्कूल, वेगुंर्ली) हिने द्वितीय तर स्वराली गजानन गवस (मळगांव इंग्लिश स्कूल, मळगांव) हिने तृतीय क्रमांक मिळाविला. योगिता विलास राऊळ (राणी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडी) व वैभवी गोविंद परब (मळगाव इंग्लिश स्कूल, मळगांव) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण श्री. किशोर अरविंद वालावलकर व श्री. विलास राजाराम चव्हाण सावंतवाडी यांनी केले.
सदर स्पर्धेचे पारितोषिक वितरण ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता स्व. प्राचार्य रमेश कासकर स्मृती कथाकथन स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. विजेत्या स्पर्धेकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनमंदिर तर्फे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला संचालक हेमंत खानोलकर, चंद्रकांत जाधव, शांताराम गवंडे तसेच माजी संचालक बाळकृष्ण मुळीक, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, पालक, शिक्षक, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन, व आभार प्रदर्शन कार्यवाह स्नेहा खानोलकर यांनी केले.



