माटणेकरांचं ठरलंय, विधायक कार्यासाठी हवा ‘हाच’ एकमेव लढवैय्या नेता! – रविकिरण गवस!

  • ✍️ रूपेश पाटील.
  • दोडामार्ग : तालुक्यातील माटणे जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेने अत्यंत विचारपूर्वक ठरवलं आहे की आजचा हा क्षण फक्त निवडणुकीचा नाही, हा क्षण आहे नव्या विचारांचा, नव्या नेतृत्वाचा आणि नव्या भविष्याचा!
    ज्या मातीत जन्म झाला, ज्या गावाने घडवलं, त्या खोक्रल गावचा सुपुत्र आणि सर्वसामान्यांच्या वेदना ज्याला बोचतात आणि अन्यायाविरुद्ध ज्याची मुठ आपोआप आवळते, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार – रविकिरण गवस!

कारण… रविकिरण गवस म्हणजे एक नेता फक्त भाषण करणारा नाही तर हा नेता रस्त्यावर उतरून लढणारा आहे.
हा नेता प्रश्न मांडून थांबत नाही तर प्रश्न सुटेपर्यंत स्वस्थ बसत नाही!
प्रदूषण करणाऱ्या बेकायदेशीर उद्योगांविरोधात आवाज असो, पर्यावरणाच्या हानी विरोधात संघर्ष असो,
मोकाट जनावरांचा त्रास असो वा दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा असोत,
वीज समस्या, नियमबाह्य रस्तेखोदाई किंवा अर्धवट पूल…
प्रत्येक ठिकाणी एकच नाव ठामपणे उभं राहिलं – रविकिरण गवस!
प्रशासनाला हलवणारा, चुकीच्या कामांवर कारवाई घडवून आणणारा,
आणि जनतेचा विश्वास कमावणारा नेता म्हणजे – रविकिरण गवस. 

“प्रश्न मांडणारा नाही, प्रश्न सोडवणारा नेता!”
लोकनेते शरद पवार साहेबांच्या विचारांची शिदोरी घेऊन, पुणे–बारामतीच्या विकास मॉडेलप्रमाणेचं माटणे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार आज रविकिरण गवस यांनी केला आहे.
लोकनेते सुरेश दळवी, कोकण प्रदेश महिला अध्यक्ष सौ. अर्चना घारे-परब, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत
यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने ही उमेदवारी म्हणजे जनतेच्या आशेचा नवा अध्याय आहे.

आज माटणे मतदारसंघात हवा आहे – प्रस्थापित व्यवस्थेला हादरा देणारा बदल!
हवा आहे – भयमुक्त, अभ्यासू आणि लोकाभिमुख नेतृत्व!
म्हणूनच, या वेळी फक्त मत देणार नाही तर नक्कीच इतिहास घडवू!, असा ठाम निर्धार मतदार संघातील जनतेनेच केलाय!

रविकिरण गवस यांचं जनतेला हृदयपूर्वक आवाहन! 

”माझ्या माटणे मतदारसंघातील तमाम प्रिय मतदार माय-बहिणींनो आणि बांधवांनो,
आज मी तुमच्यासमोर फक्त एक नेता म्हणून नाही,
तर तुमच्यातलाच एक कार्यकर्ता म्हणून उभा आहे.
मी प्रश्न मांडण्यासाठी नव्हे,
ते प्रश्न सोडवण्यासाठी मैदानात उतरलो आहे.
प्रदूषण करणारे उद्योग असोत,
अर्धवट पूल असोत,
रुग्णालयातील गैरसोयी असोत,
की शेतकऱ्यांचे प्रश्न —
मी कधीच मागे हटलो नाही!
लोकनेते शरद पवार साहेबांच्या विचारांवर
विश्वास ठेवून मी सांगतो,
माटणे मतदारसंघाचा विकास करून दाखवू!
आज निर्णय तुमच्या हातात आहे —
जुनी व्यवस्था की नवा बदल?
जर तुम्हाला विकास हवा असेल,
तर या वेळी…
– मला आपल्या सेवेची फक्त एकदाच संधी द्या!”

🙏आपलाच 🙏

🙏रविकिरण गवस🙏

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles