✍️ रूपेश पाटील.
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत सिंधुदुर्गच्या राजकारणावर आपली पकड किती मजबूत आहे, याचे पुन्हा एकदा जोरदार शक्तिप्रदर्शन भाजप नेते व पालकमंत्री नितेश राणे यांनी घडवून आणले आहे. राजकीय चातुर्य, संघटन कौशल्य आणि मैदानातील अचूक रणनीती यांच्या जोरावर राणेंनी विरोधकांना सुरुवातीलाच धक्का दिला आहे.
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली लढणाऱ्या महायुतीने निवडणूक प्रक्रियेच्या प्रारंभीच ‘राजकीय स्फोट’ घडवत जिल्ह्यातील एकूण ११ जागांवर बिनविरोध विजयाची पताका फडकावली आहे. यामध्ये ५ जिल्हा परिषद आणि ६ पंचायत समिती जागांचा समावेश असून, हा विजय केवळ आकड्यांचा नाही तर राजकीय वर्चस्वाचा ठाम संदेश देणारा ठरला आहे.
सिंधुदुर्गच्या मातीत राणेंचे राजकारण किती खोलवर रुजले आहे, याचे हे ठळक उदाहरण मानले जात आहे. विरोधकांना मैदानात उतरण्यापूर्वीच नामोहरम करणारी ही कामगिरी म्हणजे राणे कुटुंबाच्या राजकीय ताकदीचे पुन्हा एकदा झालेले प्रत्यंतर आहे.
“सिंधुदुर्गात राणेचं किमयागार” हे समीकरण यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. येणाऱ्या टप्प्यात महायुतीचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे.
– जिल्हा परिषद सिंधुदुर्ग महायुती (बिनविरोध) –
१) खारेपाटण जि.प.उमेदवार – प्राची इस्वलकर(भाजप)
2) जाणवली जि. प. उमेदवार.सौ. रुहिता राजेश तांबे (शिवसेना शिंदे गट)
3) पडेल जि. प. उमेदवार(देवगड) श्रीमती सुयोगी रवींद्र घाडी (भाजप)
४) बापर्डे जि. प. उमेदवार(देवगड) सौ.अवनी अमोल तेली (भाजप)
५) बांदा जि. प. उमेदवार श्री. प्रमोद कामत (भाजप)
– कणकवली तालुका पंचायत समिती महायुती ( बिनविरोध)
१)बिडवाडी – सौ. संजना संतोष राणे (भाजप )
2 )वरवडे – श्री. सोनू सावंत (भाजप)
देवगड तालुका पंचायत समिती(बिनविरोध) –
१)पडेल –अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)
२)नाडण –गणेश सदाशिव राणे (भाजप)
३)बापर्डे – संजना संजय लाड (भाजप)
– वैभववाडी तालुका पंचायत समिती. (बिनविरोध) –
१)कोकिसरे – सौ.साधना सुधीर नकाशे (भाजप)



