विविध मागण्यांसाठी माहिती अधिकार पदाधिकारी सुशील चौगुले यांचे प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण.

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासकीय हलगर्जीपणा आणि जबाबदार अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात माहिती अधिकार पदाधिकारी सुशील चौगुले हे उद्या सोमवार दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हाधिकारी Couldn’t समोर आमरण उपोषण करणार आहेत. वीज, ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित गंभीर प्रश्नांवर कारवाई होत नसल्याने हे उपोषण हाती घेण्यात आले आहे.
पहिल्या मागणीनुसार, बांदा वीज वितरण कार्यालयाने ११ हजार व्होल्ट विद्युत वाहिनीचे पोल गॅस कटरच्या साहाय्याने तोडून गाव माडखोल–उभवाडी (ता. सावंतवाडी) येथील श्री प्रवेश गवंडी यांच्या जीवितास जाणीवपूर्वक धोका निर्माण केला. सदर घटनेत दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चौगुले यांनी केली आहे.
दुसऱ्या मागणीत, साटेली तर्फ सातर्डा ग्रामपंचायत हद्दीतील घर बांधणी परवानगीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. ०६ ऑगस्ट २०२३ रोजी सर्व कागदपत्रे सादर करूनही आजमितीस परवानगी न मिळाल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर चौगुले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तात्काळ परवानगी देण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.
तिसऱ्या मागणीनुसार, साटेली तर्फ सातर्डा महामार्गालगत (कळंगुटकरवाडी ते आरोस मंदिर, अनु. क्र. ३५०) जिल्हा परिषद मालकीच्या रस्त्यावर बेकायदेशीर फलक उभारण्यात आला आहे. सदर फलक तात्काळ काढून टाकावा तसेच दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जोपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा इशारा सुशील चौगुले यांनी दिला आहे. या उपोषणामुळे प्रशासनाची भूमिका काय राहते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles