मितभाषी व्यक्तिमत्व अन् तळमळीचा नेता, जनतेचा हक्काचा आवाज – जितेंद्र ऊर्फ जितू गावकर. ; माजगाव पं. स. निवडणुकीत अपक्ष रिंगणात.

✍️ रूपेश पाटील.

सावंतवाडी :  वेत्ये गावाच्या मातीशी नाळ जुळलेला, जनतेच्या सुखदुःखाशी आपुलकीने जोडलेला आणि कार्यातून नेतृत्व सिद्ध करणारा एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे माजगाव पंचायत समिती गणातून अपक्ष निवडणूक रिंगणात उतरलेले यशस्वी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गावकर ऊर्फ जितू गावकर. आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजासाठी काहीतरी देण्याची आग मनात बाळगून त्यांनी आजवर जे कार्य केले आहे, ते केवळ उल्लेखनीयच नव्हे तर प्रेरणादायी ठरले आहे.
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अशा सर्वच क्षेत्रांत त्यांनी सातत्यपूर्ण आणि निःस्वार्थ योगदान दिले आहे. गरजूंच्या मदतीसाठी धावून जाणे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावणे, संस्कृती व परंपरा जपणाऱ्या उपक्रमांना चालना देणे आणि अध्यात्माच्या माध्यमातून समाजात सकारात्मकता निर्माण करणे या सर्व बाबी त्यांच्या कार्याची ओळख ठरल्या आहेत.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांनी स्वतःच्या ऍग्रो कंपनीच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. “फक्त बोलणारा नेता नव्हे, तर कृतीतून बदल घडवणारा कार्यकर्ता” ही त्यांची प्रतिमा त्यामुळे अधिक भक्कम झाली आहे. रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून त्यांनी अनेक कुटुंबांच्या जीवनात स्थैर्य आणि आशेचा प्रकाश आणला आहे.
आज ते पंचायत समिती माजगाव मतदार संघातून अपक्ष उमेदवारी लढवत आहेत. कोणत्याही पक्षाच्या चौकटीत न अडकता, थेट जनतेशी नाते जोडणारा हा उमेदवार जनविश्वासाचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्यांच्या प्रामाणिकतेमुळे, स्वच्छ चारित्र्यामुळे आणि लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे त्यांना जनतेचा प्रचंड आणि उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.
विशेषतः युवा वर्गात जितू गावकर प्रचंड लोकप्रिय आहेत. तरुणाईला प्रेरणा देणारी त्यांची ऊर्जा, स्पष्ट विचारसरणी आणि भविष्याभिमुख दृष्टीकोन यामुळे तरुण मतदार त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत. “आपलाच माणूस, आपल्या प्रश्नांची जाण असलेला नेता” अशी भावना जनमानसात रुजली आहे.
आजच्या राजकारणात जिथे स्वार्थ आणि दिखावा वाढत चालला आहे, तिथे जितेंद्र ऊर्फ जितू गावकर हे सेवाभाव, साधेपणा आणि संघर्षशीलतेचे प्रतीक म्हणून उभे राहतात. त्यांची उमेदवारी म्हणजे केवळ एक निवडणूक नाही, तर विकास, विश्वास आणि परिवर्तनाची चळवळ आहे.
जनतेच्या बळावर, जनतेसाठी आणि जनतेसह चालणारा हा प्रवास निश्चितच माजगाव मतदार संघाच्या उज्ज्वल भविष्याकडे नेणारा ठरेल, यात शंका नाही.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles