विकासाचा स्पष्ट रोडमॅप देणारे दिपस्तंभ हरपले : रविकिरण गवस यांची उपमुख्यमंत्री अजितदादांना भावपूर्ण आदरांजली!

दोडामार्ग : आज महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जनतेच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारे, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारे आणि विकासाचा स्पष्ट रोडमॅप देणारे अजित दादा आज आपल्यातून कायमचे निघून गेले, ही बातमी अत्यंत वेदनादायक आहे.
अजित दादांची कार्यपद्धती ही नेहमीच वेगळी आणि प्रेरणादायी राहिली. गावातील प्रत्येक कार्यकर्त्याची नावासहित माहिती त्यांना असायची. दादांच्या आवाजात बोलण्याची एक खास ताकद होती—त्या आवाजाने कार्यकर्त्यांना हुरूप यायचा, नवीन ऊर्जा मिळायची. प्रत्येक सभा, कार्यकर्ता मेळावा किंवा बैठक ही पक्क्या टाइम टेबलनुसार, शिस्तबद्ध आणि परिणामकारक असायची.
विकासाबाबत दादांचे नियोजन अत्यंत अभ्यासपूर्ण होते. पुणे–बारामती विकास पॅटर्न हे त्यांचे आदर्श मॉडेल होते—विकास कसा करावा, निधी कसा वापरावा आणि तो सामान्य माणसापर्यंत कसा पोहोचवावा, याची ठोस दिशा त्यांनी दिली. कोणतीही अडचण असो, समस्या कितीही मोठी असो, त्यावर मार्ग मोकळा करणारे, धाडसी आणि खंबीर नेतृत्व म्हणजे अजित दादा होते.
दादांची कार्यशैली, संवादाची पद्धत आणि निर्णयक्षमता यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आत्मीयता निर्माण झाली होती. दादांची लास्ट भेट पुणे महानगरपालिकेच्या प्रचारादरम्यान झाली होती. त्या वेळीही ते नेहमीप्रमाणे जोशात, विकासाच्या मुद्द्यांवर स्पष्ट बोलताना आणि कार्यकर्त्यांना दिशा देताना दिसले.
आज त्यांच्या जाण्याने केवळ एक नेता नाही, तर कार्यकर्त्यांचा आधारवड, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान हरपले आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांप्रती, आप्तस्वकीयांप्रती आणि असंख्य समर्थकांप्रती मी मनापासून शोकसंवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना.
शोकाकुल..
रविकिरण गवस
NCP सावंतवाडी

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles