आरोंद्यात फक्त अपक्ष शर्वाणी गांवकरांचीचं हवा! ; शर्वाणी गांवकरांच्या झंझावातापुढे इतरांची पळापळ!

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचे राजकारण अक्षरशः उघडे पडले असून, अपक्ष उमेदवार शर्वाणी गांवकर यांच्या जोरदार मुसंडीने सत्ताधाऱ्यांचे सर्व गणित कोलमडले आहे.
महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार सुदन कवठणकर रिंगणात असले तरी, मैदानात उतरल्यापासून गावोगावी मिळणारा प्रतिसाद पाहता ही लढत आता औपचारिक ठरत चालली आहे. विकासाचे दावे, पक्षशिस्तीची भाषा आणि वरून आलेली उमेदवारी — या सगळ्याला मतदारांनी स्पष्ट नकार दिल्याचे चित्र आरोंद्यात दिसत आहे.
भाजपमधील अंतर्गत नाराजी, कार्यकर्त्यांची कुचंबणा आणि स्थानिक नेतृत्वाकडे झालेले दुर्लक्ष महायुतीसाठी घातक ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर माजी सभापती शर्वाणी गांवकर यांनी ‘काम, संपर्क आणि विश्वास’ या त्रिसूत्रीवर थेट हल्ला चढवत महायुतीची पकड सैल केली आहे.
अमेय आरोंदेकर यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर आरोंद्यातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलले असून, ही लढत आता स्पष्टपणे ‘महायुती विरुद्ध शर्वाणी गांवकर’ अशीच झाली आहे. इतर अपक्ष उमेदवार असले तरी, खऱ्या अर्थाने मैदान तापवले आहे ते गावकर यांनीच.
महायुतीकडील उमेदवार पक्षाच्या नावावर मतं मागत असताना, शर्वाणी गांवकर आपल्या कामगिरीवर आणि जनसंपर्कावर मत मागत आहेत — आणि हाच फरक निर्णायक ठरत आहे. त्यामुळे आरोंद्यात “पक्ष नव्हे, परखड नेतृत्व” हा नारा जमिनीवर उतरल्याचे स्पष्ट दिसत आहे.
आजची परिस्थिती पाहता, आरोंदा मतदारसंघात महायुती बचावात्मक भूमिकेत गेली असून, शर्वाणी गांवकर आक्रमक पवित्र्यात आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
निकालाच्या दिवशी महायुतीला मोठा धक्का बसण्याची चिन्हे ठळक असून, आरोंद्यातून सत्ता विरोधात ठोस संदेश जाण्याची दाट शक्यता आहे.
एकंदरीत, आरोंद्यात सत्ता टिकवण्याची धडपड सुरू असताना, शर्वाणी गांवकर विजयाच्या दिशेने निर्धाराने आगेकूच करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles