विरोधकांनीच माझा विजय सोपा केलाय!, सर्वांगीण विकास हाच माझा अजेंडा म्हणून जनतेचे मलाचं आशीर्वाद! : संदीप गावडे. ; जनतेचा विश्वास सार्थ करून दाखविणार, तळवडे नंबर १ ला नेणार!

सावंतवाडी : तळवडे मतदारसंघाला विकासात एक नंबरवर नेण्याचा निर्धार मी केला असून, आतापर्यंत हाती घेतलेली प्रत्येक विकासकामे पूर्णत्वास नेणारच, असा ठाम विश्वास महायुतीचे उमेदवार संदीप गावडे यांनी व्यक्त केला. ‘विकास, प्रगती आणि तळवडे मतदारसंघाची सर्वांगीण उभारणी’ हेच माझे स्पष्ट व्हिजन असल्याने जनतेचा भरभरून पाठिंबा मला मिळत आहे. त्यामुळेच माझे विरोधक केवळ एकाच मुद्द्यावर अडकून वारंवार मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रत्यक्षात माझाच विजय अधिक सोपा करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
महायुतीतील सर्व वरिष्ठ नेत्यांचे भक्कम आशीर्वाद माझ्या पाठीशी असून, तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात माझा विजय निश्चित आहे, असा आत्मविश्वासही गावडे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, यावेळी बोलताना सूरज परब म्हणाले, “महायुती आज अभेद्य आहे. कितीही डावपेच आखले तरी येथे महायुतीचेच सर्व उमेदवार विजयी होणार. ९ फेब्रुवारीला गुलाल आम्हीच उधळणार!”

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles