सावंतवाडी : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कोनशी (ता.सावंतवाडी) येथील उपक्रमशील, अभ्यासू, नवोन्मेषी, उच्चविद्याविभूषित नवनियुक्त शिक्षणसेवक डॅा. राजेंद्र लक्ष्मण चव्हाण यांनी वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय शिक्षक व अधिकारी शोधनिबंध स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादित केले आहे. राज्यातून निवड झालेल्या टॅाप टेन स्पर्धकांमध्ये त्यांचा द्वितीय क्रमांक आला असून, या यशांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सेट, नेट-जेआरएफ व पीएच.डी सह उच्चविद्याविभूषित असूनही ही दुर्गम भागातील कोनशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत राहून सातत्यपूर्ण संशोधन, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, मूक्त शैक्षणिक साधनस्त्रोतांचा वापर आणि समजपूर्ण विद्यार्थीकेंद्रित शिक्षणावर भर देत डॅा. चव्हाण यांनी ही कामगिरी साध्य केली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यातील शिक्षक व अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी विविध विषयांतील एकूण ४३ शैक्षणिक व संशोधनात्मक स्पर्धांचे आयोजन केले होते. याच अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय, विभागीय स्तरावरीय व राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला होता.
*स्वयं-अध्ययन मॅाड्युलची निर्मिती व शास्त्रीय मांडणी*
_*शोधनिबंध उच्चप्राथमिक स्तरावरील शिक्षकांना वैज्ञानिक संकल्पनांचे आकलन, अध्ययन-अध्यापन करताना येणा-या समस्यांचा शोध घेतला होता. त्याआधारे उच्चप्राथमिक स्तरावरील शिक्षकांसाठी वैज्ञानिक संकल्पनांचे अध्ययन वृद्धिंगत होण्यासाठी स्वयं-अध्ययन मॅाड्युलचे विकसन करून शास्त्रीय मांडणी केली होती. विषयाची उपयुक्तता, संशोधनात्मक दृष्टिकोन, सादरीकरण कौशल्ये व शैक्षणिक परिणामकारकता या निकषांवर परिक्षकांनी मूल्यांकन केले. त्यामध्ये डॅा. राजेंद्र चव्हाण यांचा शोधनिबंध प्रभावी ठरत राज्यस्तरावर टॅाप टेन मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला*_
या यशाबद्दल शिक्षणाधिकारी (प्राथमिक) निलिमा नाईक, डायट सिंधुदुर्गचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे, बांदा प्रभाग शिक्षण विस्तार अधिकारी लक्षमीदास ठाकूर, तांबुळी केंद्रप्रमुख आर. बी. गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौरभ सिद्धये, मुख्याध्यापक सुरेश जाधव, सहकारी शिक्षक, पालक ग्रामस्थांनी डॅा. चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे.



