उद्या मतमोजणीसाठी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी प्रशासनाचे ‘असे’ आहे नियोजन.

सावंतवाडी : जिमखाना मैदान बॅडमिंटन हॉल येथे उद्या दिनांक ९/२/२०२६ रोजी होणारे जिल्हा परिषद पंचायत समिती, सावंतवाडी तालुक्याचे मतमोजणी प्रक्रिये दरम्यान विविध राजकीय पक्षाचे व्यक्तींना निकाल ऐकण्याकरता उभे राहण्यासाठी खालील प्रमाणे जागा ठरवून दिलेल्या आहेत.
१) भारतीय जनता पक्ष – एस एस मोबाईल शॉपीकडील प्रवेशद्वार मधून प्रवेश करून दिलेल्या जागेत उभे राहणे.

२) शिवसेना (ठाकरे गट) – स्वार हॉस्पिटल समोरील प्रवेशद्वाराने मैदानात प्रवेश करून दिलेल्या जागेत उभे राहणे.

३) शिवसेना – (शिंदे गट)
जिमखाना मोठ्या मैदानावर लाखे वस्ती समोरील प्रवेशद्वाराने आत प्रवेश करून रस्त्यालगतचा नेमून दिलेला भाग.

४) काँग्रेस – जिमखाना मोठ्या मैदानावर लाखे वस्ती समोरील प्रवेशद्वाराने आत प्रवेश करून मैदानाचा नेमून दिलेला मध्यभाग.

५) अपक्ष उमेदवार यांचे समर्थक – जिमखाना मोठ्या मैदानावर लाखे वस्ती समोरील प्रवेशद्वाराने आत प्रवेश करून मैदानातील मध्य खेळपट्टीच्या उजवीकडील भाग.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles