माझी शाळा माझा स्वाभिमान, माजी विद्यार्थी प्रशालेचा अभिमान! ; नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य गौरव मुळीक यांचे नेमळे शाळेत अभिनंदन!

सावंतवाडी : शाळेचा कोणताही आजी माजी विद्यार्थी हा त्या शाळेचा अभिमान असतो. ह्याच उदात्त भावनेतून मळगाव पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य आणि नेमळे हायस्कूलचे माजी विद्यार्थी गौरव मुळीक यांनी नुकतीच आपल्या शाळेला सदिच्छा भेट दिली. एका माजी विद्यार्थ्याने लोकप्रतिनिधी म्हणून यश संपादन केल्यानंतर आपल्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही भेट दिल्याने गौरव मुळीक यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

​याप्रसंगी प्रशालेच्या वतीने गौरव मुळीक यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत मुळीक यांनी शाळेच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला श्री. गुडेकर सर, अनिल कांबळे सर, श्री. राऊळ सर, देवेंद्र भगत, सुहास पिकुळकर, प्रवीण वेंगुर्लेकर, शशी राऊळ आणि नंदकुमार देवळी आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी मुळीक यांच्या भावी राजकीय प्रवासाला शुभेच्छा दिल्या. एका ग्रामीण भागातील तरुणाने मेहनतीच्या जोरावर पंचायत समितीपर्यंत मारलेली झेप ही सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी शिक्षकांनी व्यक्त केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles