शिवरायांची शासन व्यवस्था सर्वकाळात आदर्शवत! : आ. दीपक केसरकर. ; आ. केसरकरांच्या कार्यालयात शिवरायांचा जन्मोत्सव उत्साहपूर्ण संपन्न!

सावंतवाडी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या ‘श्रीधर अपार्टमेंट’ येथील संपर्क कार्यालयात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बालगोपाळांच्या जयघोषाने आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

या सोहळ्याप्रसंगी माजी मंत्री तथा आ. दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आ. केसरकर म्हणाले, छत्रपती शिवरायांची शासन व्यवस्था ही सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी अत्यंत आदर्श आणि सर्वांचा विचार करणारी होती. शत्रूच्या स्त्रीला मातेचा दर्जा देणारे जगातील ते एकमेव राजा आहेत. महाराजांची किर्ती जोपर्यंत चंद्र सूर्य आणि पृथ्वी आहे तोपर्यंत अबाधित राहील त्यांना आणि त्यांच्या विचारांना वंदन करणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे श्री. केसरकर यांनी नमूद केले.

उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना संजू परब म्हणाले की,  “छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे कार्यकर्तृत्व आणि स्वराज्य निर्मितीचा इतिहास आपल्या सर्वांसाठी कायमच प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊनच आपण सर्वांनी जनसेवेचे आणि लोकप्रतिनिधी म्हणून कार्य केले पाहिजे.”

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित लहान मुलांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी, जय शिवाजी” अशा घोषणा दिल्या, ज्यामुळे सावंतवाडी शहर परिसर दणाणून गेला.

या कार्यक्रमाला महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, सीमा नाईक, ॲड. सायली दुभाषी, नगरसेवक बाबू कुडतरकर आणि नवनिर्वाचित सभापती सुष्मिता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच  या मंगलप्रसंगी माजी नगरसेवक गुरु मठकर, सुप्रिया धारगळकर, पूजा नाईक, भारती परब, शिवानी पाटकर, सिद्धी निंबाळकर, राजश्री निर्गुण, शितल नाईक, प्रतीक्षा मिशाळ, अनघा सावंत, हर्षद जाधव, गुंडू जाधव, विश्वास घाग, राजन रेडकर, सुनील नाईक, राजन परब, संदेश सोनुर्लेकर, विजय देसाई, महादेव राऊळ, वैशाली कानसे, शिल्पा मेस्त्री आणि विनायक महाडेश्वर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी आणि शिवप्रेमी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles