सावंतवाडी : शहरातील गवळी तिठा येथील राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या परिसरातील शिवजन्मोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे मंडळाचे सल्लागार तथा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी उपस्थित शिवप्रेमींना आणि नागरिकांना साखर वाटून सर्वांची तोंडं गोड केली. शिवरायांच्या विचारांचा गोडवा जनमानसात जावा, या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.
या दिमाखदार सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून शिवरायांना अभिवादन केले.
यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे. पत्रकार राजन तावडे, दीपक सावंत, नगरसेविका दिपाली भालेकर. सामाजिक कार्यकर्ते नारायण सावंत, बंड्या तोरस्कर, दिलीप पवार, अशोक पेडणेकर आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप भालेकर, प्रदीप भालेकर, मंतेश पडते, सत्यम सावंत, सुरेश ठाकूर, चिनू खानोलकर, प्रदीप नाईक, महादेव राऊळ, संजय साळगावकर, सोन्या कासार, शुभम मळकाचे, मनोज घाटकर, संदीप नाईक, राजेंद्र सांगेलकर, मनोज राऊळ, सचिन तेली आणि रवी जाधव यांसह मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.सावंतवाडीत राजा शिवाजी चौक परिसरात झालेल्या या उत्सवामुळे संपूर्ण शहरात शिवसेवेचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.



