कलंबिस्तकरांना सलाम! ; जाणता राजांना दिला रक्तदानाने मानाचा मुजरा! ; ‘शिवजयंती’ सामाजिक उपक्रमांनी साजरी, रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान. ; स्वराज्य रक्षक मंडळ, ऑन कॉल रक्तदाते संस्थेचा स्तुत्य उपक्रम.

सावंतवाडी : शिवजयंतीचे औचित्य साधून कलंबिस्त – गणशेळवाडी येथे ‘स्वराज्य रक्षक मंडळ’ आणि ‘ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग’ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी भव्य रक्तदान शिबीर पार पडले. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी गणशेळवाडी येथील ‘शिवस्मारक’ येथे आयोजित या शिबिरात २१ रक्तदात्यांनी रक्तदान करून छत्रपती शिवाजी महाराज यांना रक्तांजली अर्पण केली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श या निमित्ताने गावाने समोर ठेवला आहे.

या शिबिरात नेमळे येथील कमलेश भैरे, ग्रामसेवक केशव पावरा, सांगेलीचे विठ्ठल राऊळ व हर्षद राऊळ यांसारख्या तरुणांसह स्थानिक महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी या शिबिराला सदिच्छा भेट देऊन आयोजकांचे मनोबल वाढवले. व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस, प्रल्हाद तावडे, सयाजी पवार, बाबली गवंडे आणि सिद्धार्थ पराडकर यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

शिबीर यशस्वी करण्यासाठी रविकमल सावंत, रविंद्र तावडे, दीपक सावंत, सयाजी पवार, विक्रांत तावडे, सचिन सावंत, रघुनाथ सावंत, प्रतिक सावंत आणि इतर कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे नेटके प्रास्ताविक रविकमल सावंत यांनी केले, तर सूत्रसंचालन पोलीस पाटील सौ. प्रियांका सावंत यांनी सांभाळले. शेवटी सौ. राधिका सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles